रत्नागिरी :
कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभेतर्फे यंदा दीप अमावस्येच्या दिवशी हवामान खाते कार्यालयासमोरच्या यशवंत हरी गोखले सभागृहात श्रावण मासारंभ निमित्ताने टिपऱ्या आणि भोवत्यांचा कार्यक्रम २४ जुलै रोजी संध्या. ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. यावेळी विविध आणि आकर्षक दिव्यांची आरास देखील केली जाणार आहे.
लांजातील कोकाकोला ग्रुपच्यावतीने टिपऱ्या आणि भोवत्यांचे नृत्य सादर करण्यात येणार असून कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी आणि सहभागी होण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.








