वृत्तसंस्था / मेलबोर्न
अॅडलेटची दुसरी कसोटी 10 गड्यांनी जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघाचे माजी कर्णधार टीम पेनने कौतुक केले आहे. यापूर्वी म्हणजे या मालिकेतील पर्थच्या पहिल्या कसोटीत भारताकडून पराभव झाल्यानंतर टीम पेनने ऑस्ट्रेलियन संघावर जोरदार टीका केली होती. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीत कर्णधार पॅट कमिन्स तसेच लाबुशेन यांची कामगिरी दर्जेदार झाली. तसेच स्टार्कला योग्यवेळी सूर मिळाल्याने ऑस्ट्रेलियाला अॅडलेटची कसोटी जिंकताना विशेष परिश्रम घ्यावे लागले नाहीत. या सामन्यात भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी कोलमडल्याने ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळू शकला. आता ही मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली असून उर्वरित सामन्यात पुन्हा चुरस पहावयास मिळेल, अशी आशा पेनने व्यक्त केली.









