Tilari Tourism Development and Employment Solidarity Forum established in Dodamarga–
तिलारी येथे आंतरराज्य धरण प्रकल्प आहे. निसर्गाचे अद्भुत चमत्कार आहेत. शुद्ध हवा, मुबलक पाणी, वीज निर्मिती प्रकल्प या साऱ्या बाबी असताना हा भाग ओसाड का ? हा भाग विकसित करा आम्हाला रोजगार द्या म्हणून या भागातील अनेक युवक युवती एकत्र आले आहेत. नुकतीच "तिलारी पर्यटन विकास आणि रोजगार एकता मंच" ची स्थापना करण्यात असून सोशल माध्यमावर मंचच्या
नावाने ग्रुपची स्थापना करण्यात आली असून तालुक्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. या मंच मध्ये कोणतीही कार्यकरणी नसून सर्व सदस्यांना सामान दर्जा असून "आम्हाला रोजगार द्या" ही मागणी आहे.
शिवाय फक्त रोजगार द्या असे न मागता काय करता येईल तिलारीत याचा स्पेशल 'डाटा' सुद्धा मंचने तयार केला आहे. लवकरच हा डाटा पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यटन मंत्री, शिवाय स्थानिक खासदार, आमदार आणि लोकप्रतिनिधी यांना देण्यात येणार आहे. या मंचमध्ये तूर्त शंभर सदस्यांची नोंदणी झाली असून हा आकडा वाढत आहे अशी माहिती मंचच्या वतीने देण्यात आली.
दोडामार्ग/प्रतिनिधी-