सचिन राजगोळकर ‘मालिकावीर’
बेळगाव : टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटना व क्रीडाभारती बेळगाव यांच्या संयुक्त विद्यामानाने आयोजित बेळगाव शहर माध्यमिक क्रीडा शिक्षकांच्या टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत टिळकवाडी विभागाने कॅम्प विभागाचा पराभव करीत सलग दुसऱ्या वर्षी विजेतेपद पटकाविले. सचिन राजगोळकर यांना मालिकावीर पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
टिळकवाडी येथील व्हॅक्सिनडेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करताना कॅम्प विभागाने 8 षटकात 4 बाद 46 धावा केल्या. त्यात सचिन राजगोळकरने 13 धावा केल्या. टिळकवाडी विभागातर्फे जयसिंग धनाजी यांनी 2, देवेंद्र कुडची व उमेश बेळगुंदकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना टिळकवाडी विभागाने 5 षटकात 1 बाद 47 धावा करित सामना 9 गड्यांनी जिंकला. त्यात किरण तरळेकरने 18, उमेश बेळगुंदकरने 20 धावांचे योगदान दिले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यामत उत्तर विभागाने शहापूर विभागाचा 8 धावांनी पराभव करीत तिसरे स्थान मिळविले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे उपमहापौर आनंद चव्हाण, पुरस्कर्ते साईराजचे महेश फगरे, राजेश लोहार, हनुमान स्पोर्ट्सचे संचालक आनंद सोमण्णाचे, बेळगाव जिल्हा शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष आर. पी. वंटगुडी, माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव उमेश कुलकर्णी, टिळकवाडी विभागाच्या विविध शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. नवीन शेट्टीगार, नंदिनी मुतालिक-देसाई, सविता जे. के., गायत्री शिंदे, सावित्री नाईक, स्नेहल पाटील, टिळकवाडी शारीरिक शिक्षक संघटनेच्या अध्यक्षा सिल्विया डिलिमा या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या, उपविजेत्या संघांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी जयसिंग धनाजी, बापू देसाई, प्रवीण पाटील, अर्जुन भेकणे रामलिंग परीट, बी. जी. सोलोमन, शिवकुमार सुतार, यश पाटील, कौशीक पाटील, अनिल जनगौडा, विठ्ठल मुळकूर, किरण तरळेकर, देवेंद्र कुडची, श्रीधर हिरेमठ, बापू देसाई, संतोष दळवी, कौशिक पाटीलसह विविध शाळेचे क्रीडाशिक्षक उपस्थित होते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जयसिंग धनाजी, उत्कृष्ट गोलंदाज किरण तरळेकर, शिस्तबद्ध संघ शहापूर विभाग, उत्कृष्ट फलंदाज सचिन कुडची, मालिकावीर सचिन राजगोळकर यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला पंच म्हणून उमेश मजुकर, सचिन कुडची यांनी पंच म्हणून काम पाहिले.









