बेळगाव : सार्वजनिक शिक्षण खाते व रजपूत बंधू स्कूल आयोजित टिळकवाडी विभागीय माध्यमिक क्रीडा स्पर्धा 14 जुलैपासून प्रारंभ होणार असून 2 ऑगस्ट रोजी अॅथलेटिक्स स्पर्धा होणार असल्याची माहिती शहर शारीरिक शिक्षणाधिकारी जे. बी. पटेल यांनी केली. रजपूत बंधू स्कूलच्या सभागृहात टिळकवाडी विभागीय शारीरिक शिक्षकांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत 2023-24 ठळकवाडी विभागीय क्रीडा स्पर्धांची रुपरेषा ठरविण्यात आली. यावेळी रजपूत बंधू स्कूलचे मुख्याध्यापक पांडू मास्तणवर, टिळकवाडी विभागाचे अध्यक्ष विवेक पाटील, प्रसन्न कुरबेट आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी पांडू मास्तणवर यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पीईओ जे. बी. पटेल यांनी टिळकवाडी विभागीय स्पर्धा ऑगस्टच्या 2 तारखेपर्यंत पूर्ण कराव्यात, अशी विनंती केली. त्याप्रमाणे स्पर्धांची रुपरेषा ठरविण्यात आली. 14 जुलै रोजी योगा केएलएस स्कूलमध्ये, 15 जुलै रोजी टेबल टेनिस बालिका आदर्श येथे, 18 जुलै रोजी व्हॉलिबॉल टिळकवाडी हायस्कूल, थ्रोबॉल 18 व 19 जुलै रोजी गोमटेश व बालिका आदर्श, कब•ाr 20 व 21 रोजी डेपो मैदान, खोखो 24 रोजी गोमटेश हायस्कूल, शटल बॅडमिंटन 24 रोजी ओरियंटल, बास्केटबॉल 22 रोजी डीपी स्कूल, हॉकी 25 रोजी लेले मैदान, फुटबॉल 27 व 28 रोजी लेले मैदान, बॉल बॅडमिंटन 25 रोजी लेले मैदान, अॅथलेटिक्स स्पर्धा 2 व 3 ऑगस्ट रोजी आरपीडी मैदान येथे होणार आहे. यावेळी या बैठकीला सी. आर. पाटील, जयसिंग धनाजी, प्रवीण पाटील, रामलिंग परीट, देवेंद्र कुडची, सोमशेखर हुद्दार, एच. बी. पाटील, अनुराधा मुगळीहाळ, सिल्विया डिलिमा, उमेश बेळगुंदकर, देवकुमार मंगनाकर, अर्जुन भेकणे, ब्रिजेश सोलोमन, विठ्ठल आदी क्रीडाशिक्षक उपस्थित होते.