रत्नागिरी :
रत्नागिरीच्या टिळक आळीत लोकमान्य टिळक यांचे राष्ट्रीय स्मारक सुशोभिकरणानंतरही दर सोमवारी साप्ताहिक सुट्टी घेऊन बंद ठेवण्यात येत होते. पण राजाभाऊ लिमये यांच्या तक्रारीनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी लोकमान्य टिळक जन्मभूमी स्मारक आता सोमवारीही पर्यटकांसाठी खुले ठेवण्याचे निर्देश पुरातत्व विभागाला दिले आहेत.
राजाभाऊ लिमये यांनी यासंदर्भात रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या सामंत यांची नुकतीच भेट घेतली. त्यांनी लोकमान्य टिळक स्मारक जन्मभूमीसंदर्भात पर्यटकांचा होणारा हिरमोड याबाबत व्यथा मांडली. त्यामुळे स्मारकाला भेटी देण्यासाठी येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांचा हिरमोड होऊन स्मारक भेटीची संधी हुकल्याने तीव्र नापसंती व्यक्त केली जात होती.








