अवनीत कौर अन् नवाजुद्दीनचा चित्रपट
कंगना रनौतच्या प्रॉडक्शन हाउसकडून निर्मित ‘टीकू वेड्स शेरू’ चित्रपटाचे पोस्टर सादर करण्यात आले आहे तसेच या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. कॉमेडी ड्रामा धाटणीचा हा चित्रपट ओटीटीवर झळकणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन साई कबीर श्रीवास्तव यांनी केले असून यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि अवनीत कौर मुख्य भूमिकेत आहे. कंगना रनौतच्या ‘मणिकर्णिका फिल्म्स’ प्रॉडक्शन हाउसच्या बॅनर अंतर्गत हा चित्रपट तयार करण्यात आला आहे. हा चित्रपट 23 जून रोजी झळकणार आहे.

‘टीकू वेड्स शेरू’ हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहता येणार आहे. तिच्या प्रॉडक्शन हाउसकडून निर्मिलेला हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटनिर्मिती माझ्यासाठी आव्हानात्मक होते, परंतु हा चांगला अनुभव होता. या चित्रपटात अत्यंत दमदार अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आहे. तसेच अवनीत कौर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. प्रेक्षक या चित्रपटाला स्वत:चे प्रेम देतील अशी अपेक्षा असल्याचे कंगनाने म्हटले आहे.
नवाजुद्दीनचा अलिकडेच प्रदर्शित झालेला चित्रपट फारसा चालला नव्हता. तर अवनीत कौर ही सोशल मीडिया स्टार असून तिचे मोठ्या संख्येत चाहते आहेत. हे चाहते तिच्या चित्रपटाची प्रतीक्षा आतुरतेने करत आहेत. सोशल मीडियावर यशस्वी ठरलेली अवनीत आता अभिनयाच्या क्षेत्रात कितपत यशस्वी ठरते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.









