कॅनबरा
चिनी सोशल मीडिया ऍप टिकटॉकवर ऑस्ट्रेलियाच्या सरकारने बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघीय प्रशासनाने सुरक्षेच्या कारणास्तव या ऍपवर बंदी घातली आहे. या बंदीमळे आता शासकीय अधिकाऱयांच्या अधिकृत उपकरणांवर टिकटॉकचा वापर करता येणार नाही. यापूर्वी भारत, अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि न्युझीलंडच्या सरकारने टिकटॉकवर बंदी घातली होती. ऑस्ट्रेलियाचे ऍटर्नी जनरल मार्क ड्रेफस यांनी गुप्तचर तसेच सुरक्षा यंत्रणांशी सल्लामसलत केल्यावर या ऍपवरील बंदीची घोषणा केली आहे.









