एनआयए ह्या राष्ट्रिय तपास यंत्रणेचा कोल्हापूरातील महत्वाच्या ठिकाणची ऱाष्ट्रिय सुरक्षेच्य़ा कारणास्तव तपास चालू आहे. तसेच अंबाबाई मंदिरातही सणासुदीच्या पार्श्वभुमीवर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आल्याची माहीती कोल्हापूरचे पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
आज पोलीस मुख्यालयात माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “सीआरपीएफ ची रॅपीड एक्शन फोर्स ही दंगल नियंत्रण करण्याचे काम करते. भविष्यात जर कोल्हापूरात अशा प्रकारची घटना घडली तर कोल्हापूरची भौगोलीक माहीती मिळावी म्हणून या फोर्सकडून संचलन करण्यात येत आहे.” अशी माहीती त्यांनी दिली.
पुढे बोलताना पोलीस अधिक्षक म्हणाले, “NIA ही राष्ट्रीय तपास यंत्रणा आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचे काम सुरु असते. देशाच्या सुरक्षेच्या अनुषंगाने प्रचंड गुप्तता पाळली जाते. जर त्यांना स्थानिक पोलिसांची गरज भासली तरच ते पोलिसांचे सहकार्य करतात. मिरजच्या रेल्वे स्थानकाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक संशयास्पद फोन आला होता. त्यामुळे पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून आम्ही कोल्हापूर रेल्वे स्थानकावर मॉकड्रील घेतलं होतं.” अशी अधिकची माहीती त्यांनी दिली.
शेवटी बोलताना ते म्हणाले, “अंबाबाई मंदिराची सुरक्षादेखील योग्य पद्धतीने ठेवली असून NIA च्या कामात अडथळा येऊ नये याची काळजी स्थानिक पोलिसांकडून घेतली जात आहे. आगामी काही महिन्यात मोठ्या प्रमाणात सण उत्सव आहेत अंबाबाई मंदिरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मंदिरात कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली तर तातडीने चौकशी करण्याचे सूचना दिल्या आहेत.” असा खुलासा त्यांनी दिला.