शशांक खेतानच्या चित्रपटाची घोषणा
बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि रश्मिका मंदाना लवकरच एका चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. दिग्दर्शक शशांक खेतानने या दोघांची स्वतःच्या चित्रपटासाठी निवड केल्याचे समजते. हा चित्रपट एक ऍक्शन ड्रामा धाटणीचा असून याचे चित्रिकरण विदेशात पार पडणार आहे.

शशांक खेतान हे स्वतःच्या चित्रपटासाठी एक नव्या जोडीला सादर करू इच्छित होतो. याचमुळे त्यांनी रश्मिका अन् टायगर ही जोडी पडद्यावर साकारण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटाचे चित्रिकरण लवकरच सुरू होण्याची अपेक्षा आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार आहेत. तर निर्मितीची धुरा करणार जौहर सांभाळणार आहे.
टायगर लवकरच अक्षय कुमारसोबत ‘छोटे मियां बडे मियां’मध्ये दिसून येणरा आहे. या चित्रपटाद्वारे अक्षय अन् टायगर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहेत. याचबरोबर टायगर सध्या ‘गणपत’चे चित्रिकरण करत आहे. या चित्रपटात क्रीति सेनॉन नायिकेच्या भूमिकेत आहे. हा चित्रपट 1982 मधील एका चित्रपटाचा सीक्वेल असणार आहे. तर रश्मिका ही सिद्धार्थ मल्होत्रासोबत ‘मिशन मजनू’ चित्रपटात दिसून येणार आहे. रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये यापूर्वीच पदार्पण पेले आहे.









