नवी दिल्ली
फूड डिलीव्हरी क्षेत्रातील कंपनी झोमॅटोतून अमेरिकेतील गुंतवणूक फर्म टायगर ग्लोबल आता बाहेर पडली आहे. कंपनीने आपली उर्वरीत हिस्सेदारी नुकतीची विकली असल्याचे समजते. टायगर ग्लोबलने ही माहिती शेअरबाजाराला दिली आहे. कंपनीने आपल्याकडील समभाग 1123 कोटी रुपयांना विकत टायगर ग्लोबर झोमॅटोतून बाहेर पडली आहे. टायगर ग्लोबलने 28 ऑगस्ट रोजी आपली उरली सुरली हिस्सेदारी विक्री केली आहे. याअंतर्गत कंपनीने 12.34 कोटी समभाग अर्थात 1.44 टक्के इतकी हिस्सेदारी विक्री केली आहे.









