अभिजीत खांडेकर / तरूण भारत
कर्नाटकात राजकिय नेता आणि अभिनेत्यांची वाघाच्या नखांपासून बनवण्यात आलेले पेडंट (Karnataka news) वापरल्याबद्दल आणि त्याचे फोटो समाज माध्यमांवर टाकल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. सोशल मीडीयावर लोकांनी यासंबंधी प्रशासनाला प्रश्नांची सरबत्ती केल्यानंतर वनविभागाने कारवाई करत माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी, कन्नड अभिनेता दर्शन, आध्यात्मिक गुरु विनय गुरूजी यांच्याबरोबर कन्नड बिग बॉस मधील स्पर्धकाची चौकशी करण्यात येत आहे.
काही दिवसापुर्वी कन्नड बिग बॉसमधील स्पर्धक वरथूर संतोष याने टिव्हीवर आपल्या गळ्यातील पेंडंट दाखवताना हे आपल्या आईने भेट दिले असल्याचे सांगितले होते. त्यानंतर वनविभागाने वरथूर संतोषला ताब्यात घेऊन वाघाच्या नख्या बाळघल्या प्रकरणी चौकशी सुरु केली होती.
त्यानंतर लगेत कर्नाटकामध्ये सोशल मीडीयावर अनेक अभिनेता आणि नेत्यांचे वाघांच्या नखांचे पेडंट घातलेले फोटो व्हायरल झाले. नागरिकांनी फक्त सामान्य लोकांवरच कारवाई का नेत्या अभिनेत्यांवर का कारवाई करत नाही असा जाब सरकारला विचारला. त्यानंतर वनविभागाने लगेच कारवाई करत संशयितांच्या घरावर छापे टाकून त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले. छापा टाकण्यात आल्यानंतर संशयितांच्या घरातून काही पेंडंट जप्त करण्यात आले. ते आता फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल)कडे पाठवण्यात आले आहेत.
अभिनेता दर्शनचा एका मंदिरात पुजा करताना वाघाच्या नख्यापासून तयार केलेला पेंडंट त्याच्या गळ्यात दिसून आला आहे. तसेच ‘बीग बॉस’चा स्पर्धक जगेश आपण २० वर्षांचा झाल्यावर आईने भेट दिला असल्याचा सांगतानाचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
दरम्यान, कोप्पाजवळील गोवारीगड्डे येथील विनय गुरुजींच्या आश्रमावरही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. विनय गुरूजी यांनी काही दिवसापुर्वी वाघाच्या कातड्यावर बसून फोटो काढला होता. त्याची चौकशी केली असता या वाघाचे कातडे एका भक्ताने अर्पण केल्याचे गुरुजींनी अधिकाऱ्यांना सांगितले. “शिवमोग्गा येथील रहिवासी अमरेंद्र या भक्ताने आश्रमाला वाघाची कातडी भेट दिली होती. आम्ही विनय गुरुजी आणि इतरांकडून फोटोबद्दल माहिती गोळा केली आहे. त्याचा अहवाल आम्ही लवकरच सादर करू. ” वन अधिकाऱ्याने सांगितले.
त्यानंतर, जेडीएस चे नेते आणि माजी पंतप्रधान एच.डी. कुमारस्वामी यांचा मुलगा निखिल कुमारस्वामी यांच्या घरीही वनविभागाने कारवाई करत छापा टाकला. निखिल कुमारस्वामी यांचा त्यांच्या लग्नादरम्यान अशा प्रकारचे पेंडंट परिधान केलेला फोटो व्हायरल झाला होता. यावर स्पष्टीकरण देताना एच.डी. कुमारस्वामी यांनी ती वाघाची खरी नखे नसून त्याची नक्कल कली असल्याचे स्पष्ट केले.