वृत्तसंस्था / वेलिंग्टन
सध्या यजमान न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका खेळविली जात आहे. न्यूझीलंडने या मालिकेतील पहिला सामना जिंकून इंग्लंडवर आघाडी मिळविली आहे. न्यूझीलंड संघातील जेमिसन दुखापतीमुळे या मालिकेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नसल्याने क्रिकेट न्यूझीलंडने वेगवान गोलंदाज ब्लेअर टिकनरला संधी दिली आहे.
32 वर्षीय टिकनेर सोमवारी न्यूझीलंड संघात दाखल होईल. टिकनरने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकिर्दीत 13 वनडे सामन्यात 16 गडी बाद केले आहेत. 2023 च्या मे महिन्यात झालेल्या पाक विरुद्धच्या वनडे सामन्यात टिकनरचा न्यूझीलंड संघात समावेश होता. आता वनडे मालिकेतील दुसरा सामना बुधवारी हॅमिल्टन येथे होणार आहे.









