वृत्तसंस्था/ बार्सिलोना
फ्रान्सच्या फुटबॉल संघातील आघाडीफळीत खेळणारा जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू मार्कुस थुरमने अलीडकडेच इंटर मिलान फुटबॉल क्लबशी नवा करार केला आहे.
फिफाची विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धा जिंकणाऱ्या फ्रान्स फुटबॉल संघामध्ये 25 वर्षीय मार्कुस थुरमचा समावेश होता. थुरम यापूर्वी बुंदेसलिगा फुटबॉल स्पर्धेतील बोरुसिया माँचेनग्लेडबॅच क्लबकडून सिरी ए क्लबस्तरीय फुटबॉल स्पर्धेत खेळत होता. इंटर मिलान संघाबरोबर थुरमने 5 वर्षांचा करार केल्याची माहिती इटालियन प्रसार माध्यमाने दिली आहे. थुरमने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकीर्दीत 10 सामन्यात फ्रान्सचे प्रतिनिधीत्व केले आहे. 2020 साली थुरमने फ्रान्सच्या वरिष्ठ संघामध्ये आपले पदार्पण केले होते. गेल्या वर्षी कतारमध्ये झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. अर्जेंटिनाने फ्रान्सचा पराभव करत जेतेपद मिळवले होते.









