प्रतिनिधी,कोल्हापूर
Weather Update : कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर या चार जिह्यांमध्ये दि. 6 ते 8 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता वर्तवली आहे. या कालावधीत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार जिल्हा प्रशासनाने सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.
जिह्यात गेल्या काही दिवसांपासून उष्मा वाढत आहे. मंगळवारी सकाळपासूनच जिह्यात काहीअंशी ढगाळ वातावरण होते. गुरुवारपासून पुढील तीन दिवसांत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. जोरदार वारे आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस होईल असा अंदाज आहे. त्यामुळे नागरीकांनी या कालावधीत घराबाहेर पडताना दक्षता घ्यावी असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









