सेबस्टियन स्टेन-फ्लोरेन्स पुघ मुख्य भूमिकेत
मार्वलने अधिकृतपणे ‘थंडरबोल्ट्स’चा बहुप्रतीक्षित ट्रेलर जारी केला आहे. या चित्रपटासाठी प्रेक्षक अत्यंत आतुर आहेत. हा चित्रपट एंटीहीरोच्या एका समुहाच्या अवतीभवती घुटमळणारा असून जो एका मिशनवर जाण्यासाठी एक अनोखी टीम तयार करतो. यात सेबस्टियन स्टेन आणि फ्लोरेन्स पुघ मुख्य भूमिकेत आहेत. ट्रेलरमध्ये ‘थंडरबोल्टस’च्या टीमचा परिचय देण्यात आला आहे. येथे प्रत्येकाने वाईट कृत्यं केली आहेत. शॅडो ऑपरेशन, सरकारी प्रयोगशाळांना लुटणे, कॉन्ट्रॅक्ट किलिंग्स, आम्ही येथून निघून जावे असे प्रत्येकालाच वाटत आहे, असा डायलॉग फ्लोरेन्स पुघच्या तोंडी आहे. टीमचे सदस्य स्वत:चे अनुभव आणि क्षमतांसोबत एक नवे मिशन पूर्ण करण्यासाठी एकत्र येत असल्याचे ट्रेलरमध्ये दाखविण्यात आले आहे.
जेक श्रेयरकडून दिग्दर्शित ‘थंडरबोल्टस’ची निर्मिती लुइस डी एस्पोसिटो, ब्रायन चॅपेक, जेसन तामेज आणि स्कार्लेट जोहान्सनकडून करण्यात आली आहे. चित्रपटाची पटकथा एका पॉवरहाउस टीमकडून तयार करण्यात आली आहे. हा चित्रपट 2 मे 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.