Three years imprisonment for the accused in the case of molestation of a minor girl
एका अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी विशाल निलेश मोडक २२ मूळ राहणार बोर्डवे सध्या राहणार शिवाजीनगर कणकवली याला दोषी धरून विशेष जिल्हा न्यायाधीश एस. जे. भारुका यांनी त्याला तीन वर्षे कारावास आणि १ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील रुपेश देसाई यांनी काम पाहिले. १९ मार्च २०२० रोजी ही घटना घडली होती. दहावीचा पेपर सुटल्या नंतर तिच्या अज्ञान पणाचा फायदा घेत तिच्याशी अनैतिक संबंध ठेवण्याचे हेतूने तिला पळवून नेण्यात आले होते.
प्रतिनिधी / ओरोस