वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशातील मुरैना येथील पारोसा गावात एका 14 वर्षाच्या मुलाने 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. एक चिमुकली आपल्या आजीसोबत शेतात गेली होती. भूक लागल्याने ती एकटीच घरी परतत होती. याचदरम्यान अल्पवयीन मुलाने मुलीसोबत गैरवर्तन केले. या घटनेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन मुलाविऊद्ध पोक्सो कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मुरैना जिल्ह्यातील पोरसा पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. 2 नोव्हेंबर रोजी पीडितेच्या आई-वडिलांनी पोरसा पोलीस ठाण्यात जाऊन अल्पवयीन मुलाविऊद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी वैद्यकीय तपासणी व पुढील तपास प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले.









