कारवार : समुद्र लाटेच्या तडाख्यात सापडून गटांगळ्या खाणाऱ्या तीन महिला पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचविल्याची घटना रविवारी गोकर्ण जवळच्या कुडले समुद्रकिनाऱ्यावर घडली. वाचविलेल्या पर्यटकांची नावे स्मिता रवीचंद्रन (वय 23), निहारिका गिरी (वय 22), पवित्रा सुंदर (वय 22, तिघेही रा. बेंगळूर) अशी आहेत. या घटनेबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, बेंगळूर येथील काही पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी गोकर्णपासून काही कि. मी. अंतरावरील कुडले समुद्र किनाऱ्यावर दाखल झाले होते. त्यावेळी स्मिता, नीहारीका आणि पवित्रा या महिला पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी अरबी समुद्रात उतरल्या होत्या. पोहताना त्या समुद्र लाटेच्या विळख्यात सापडल्या आणि गंटागळ्या खाऊ लागल्या. ही बाब लक्षात येताच किनाऱ्यावर सेवा बजावणाऱ्या नवीन अंबीग, मंजुनाथ हरिकंत्र यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि बुडणाऱ्या महिला पर्यटकांना वाचविले. गोकर्ण पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
Previous Articleरहाणे-श्रेयस फ्लॉप, मुंबई ऑलआऊट 224
Next Article सिलिंडर स्फोटात पाच घरे जळून खाक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.