पश्चिम अमेरिकेतील उटाह या प्रांतातील अनेक पर्वतांदरम्यान एका पर्वतीय भागात 100 हून अधिक लोकांचे वास्तव्य आहे. हे लोक आदिवासी नाहीत तसेच स्थलांतरित देखील नाहीत. तरीही एका प्रथेमुळे त्यांनी स्वत:चा वेगळा समुदायच तयार केला आहे. हे सर्व लोक कट्टरवादी व्यक्ती मोरमनला मानणारे असून तेथे प्रत्येक पुरुषाला किमान 3 पत्नी आहेत. या पर्वतीय भागात सुमारे 15 कुटुंबांचे वास्तव्य असून ते एकाहून अधिक पत्नी असल्यास मृत्यूनंतर स्वर्गाचे द्वार खुले होत असल्याचे मानतात. याचमुळे या पर्वताला रॉकलँड रँच म्हटले जाते.

रॉकलँड रँच पाहण्यासाठी सर्वसाधारण पर्वतासारखा असला तरीही हा नागरी वस्ती असलेला भाग आहे. येथे राहणारे मोरमन लोक 1970 च्या दशकात येथे आले. या पंथाची सुरुवात बॉब फॉस्टरने केली होती. फॉस्टर एक शिक्षक होता, ज्याला 3 पत्नी आणि 38 मुले होती. बहुविवाह केल्यामुळे फॉस्टरला शिक्षा झाली होती. तुरुंगातून बाहेर पडताच त्याने स्वत:चा वेगळा समुदाय निर्माण करत स्वत:च्या पत्नींसोबत तो रॉकलँड रँचमध्ये राहू लागला. त्याच्या विचारांशी सहमत असणारे काही ख्रिश्चन कट्टरवादी देखील त्याच्यासोबत रॉकलँड रँचवर राहू लागले. हळूहळू हा एक मोठा परिवार होत गेला. आता तेथे राहणारे बहुतांश लोक बॉब फॉस्टरचीच मुले असल्याचे मानले जाते.
रॉकलँड रँचला अनेक ठिकाणांवरून डायनामाइटद्वारे नष्ट करण्यात आल्याने छोट्या मोठ्या गुहा तयार झाल्या आहेत. याच गुहांमध्ये लोक राहतात, परिवाराचा आकार वाढू लागल्यास घरांची संख्याही वाढत जाते. प्रारंभिक काळात येथे केवळ एक जनरेटर होता आणि टॉयलेट्सची सुविधा देखील नव्हती. आता हा मोरमन समुदाय आत्मनिर्भर झाला आहे. येथे त्यांचे स्वत:चे शेत, सौरऊर्जेचा स्रोत, पोल्ट्री फार्म आणि महामार्गाला जोडणारा रस्ता देखील आहे.
अमेरिकेत बहुविवाहाला मान्यता नाही, याचमुळे बॉब फॉस्टरला तुरुंगात कैद करण्यात आले होते. याचमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून वेगळ्याप्रकारे या समुदायाने स्वत:चे वेगळेच जगच वसविले आहे. येथील पुरुषांच्या सर्व पत्नी परस्परांमध्ये प्रेमात राहतात. त्यांच्यावर बहुविवाहाची प्रथा कुणीच लादलेली नाही, उलट त्यांनीच हा पर्याय निवडला आहे. येथील संस्कृती हिप्पींसारखी आहे. येथील मुले शाळेत जाण्यासोबत शेतांमध्ये तसेच पोल्ट्री फार्म्समध्ये देखील काम करतात. स्वत:च्या कुटुंबासोबत मिळून मिसळून राहणे येथील पुरुषांची जबाबदारी आहे. काही कुटुंब बहुविवाह करत नाहीत, परंतु तरीही ते स्वत:ला या समुदायाचा हिस्सा मानतात.









