श्रीनगर
येथील हरनंबल भागात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास तीन हायब्रिड दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. सुरक्षा दलांनी त्यांच्याकडून 10 किलो आयईडी आणि 2 ग्रेनेड जप्त केले आहेत. बॉम्ब निकामी पथकाने रंगरेथ भागात आयईडी नष्ट केला. तसेच युएपीए आर्म्स ऍक्ट आणि एक्सप्लोसिव्ह ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अटक केलेल्यांची अधिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी गेल्या आठवडय़ातही श्रीनगरमधून दोन हायब्रिड दहशतवाद्यांना शस्त्रसाठय़ासह अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारेच अन्य तिघांवर कारवाई करण्यात आल्याचे समजते.









