केरळमधील घटना
वृत्तसंस्था/ कोची
केरळमधील नेदुमंगडू येथील एका मदरशातील तीन शिक्षकांना शनिवारी मुलांचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. तिघांवरही मदरशात शिकणाऱ्या मुलांसोबत विनयभंग आणि अनैसर्गिक लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप आहे. कारवाई करण्यात आलेल्या तिघांपैकी एक मूळचा उत्तर प्रदेशमधील असल्याचे पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या शिक्षकांविऊद्ध पोक्सो आणि बाल न्याय कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे.









