ऑनलाईन टीम / तरुण भारत :
भिवंडीच्या वलपाडा परिसरात मोडकळीस आलेली तीन मजली इमारत कोसळली आहे. ढिगाऱ्याखाली 40 ते 45 रहिवासी अकडल्याची भीती व्यक्त होत असून, घटनास्थळी बचावकार्याला वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या वलपाडा परिसरातील ‘वर्धमान कंपाऊंड’ नावाची तीन मजली इमारत आज दुपारी दीडच्या सुमारास कोसळली. या इमारतीच्या खाली गोदाम होते. वरच्या दोन मजल्यांवर नागरिक वास्तव्यास होते. इमारत जमीनदोस्त झाल्याने वरच्या मजल्यावरील 40 ते 50 नागरिक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.
घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी दाखल असून ढिगाऱ्याखाली दबलेल्यांना बाहेर काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही लोकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलं असून, त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.