चंदीगड :
पंजाब पोलिसांनी ड्रग्ज आणि शस्त्र तस्करांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. अमृतसर-अटारी रोडवरील शंकर ढाब्यावरून पोलिसांनी तीन ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे. आरोपींची ओळख पटली असून अमनिंदरजीत सिंग, पीटर आणि लवजीत सिंग अशी त्यांची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून चार पीएक्स5 स्पोर्ट्स पिस्तूल, 521 ग्रॅम हेरॉइन, सात मॅगझिन आणि 55 काडतुसे जप्त केली आहेत. पोलिसांनी एनटीएफ मोहाली पोलीस स्टेशनमध्ये एनडीपीएस आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला असल्याचे पंजाबचे डीजीपी गौरव यादव यांनी सांगितले. तस्करांच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक नियुक्त केले आहे.









