सांगली :
सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयातील तरूणी बलात्कारप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या त्या तिघाजणांना सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामाही केला.
वैद्यकीय महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरूणीला गुंगीचे पेय पाजून तिघाजणांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला होता. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बिनय विश्वेष पाटील वय २२ रा. महिपती निवास, अंतरोळीकरनगर, सोलापूर शहर, सर्वज्ञ संतोष गायकवाड बय २० रा. एफ ६०५, सरगम, नांदेड सिटी, सिंहगड रोड पुणे आणि तन्मय सुकुमार पेडणेकर बय २१ रा. ३०३ कासाली व्हिला, अभयनगर सांगली या तिघाजणांना अटक केली आहे. त्यांना गुरुवारी न्यायालयासमोर उभे केले असता या तिघांना न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले..
पिडीता ही बेळगाव जिल्ह्यातील असून सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात ती एम.बी.बी.एस. चे शिक्षण घेत आहे. पिडीता तरूणी आणि संशयीत पाटील, गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत आहेत. मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने बान्लेसवाडी येथील मित्राच्या खोलीवर नेले व तिथे तिला गुंगीकारक पेय पाजून तिच्यावर बलात्कार केला. याप्रकरणी पिडीतीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली, पोलिसांनी तिन्हीही संशयितांना अटक केली, आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली








