वृत्तसंस्था/भुवनेश्वर
ओडिशाच्या मयूरभंज जिह्यात आणखी एका महिलेवर चार जणांनी बलात्कार केल्याचा प्रकार गुरुवारी उघड झाला. राज्यात गेल्या तीन दिवसात बलात्काराच्या तीन घटना उजेडात आल्या आहेत. 31 वर्षीय महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार चार जणांनी आपल्या घरात घुसल्यानंतर सर्वांनी महिलेवर बलात्कार केल्याचे म्हटले आहे. यापूर्वी मंगळवारी केओंझार जिह्यात 17 वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्यापूर्वी रविवारी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा प्रकार घडला होता.









