वृत्तसंस्था/ इंफाळ
मणिपूरमधील सुरक्षा दलांनी कांगलेई यावोल कानबा लूप (केवायकेएल) या प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून अनेक आयईडी, शस्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. तिघांनाही गुऊवारी रात्री इंफाळ पश्चिम येथील घारी भागातील सेकमाई आणि थांगमेईबंद भागात खंडणीच्या आरोपाखाली पकडण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. मैबाम ब्रॉन्सन सिंग (24), युम्नाम लांचेन्बा (21) आणि सौबम नॉन्गपोकंगांबा मैतेई (52) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून एक 9 एमएम पिस्तूल, एक मॅगझिन आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत.









