ट्रॉलीसह ट्रॅक्टर, सात मोटारसायकली, स्कुटी जप्त : महालिंगपूर पोलिसांची कारवाई
वार्ताहर/जमखंडी
वाहने चोरी प्रकरणी तिघांना अटक करून ट्रॉलीसह ट्रॅक्टर, सात मोटारसायकली व एक स्कुटी जप्त करण्याची कारवाई बागलकोट जिह्यातील महालिंगपूर पोलिसांनी केली. या वाहनांची किंमत अंदाजे 9 लाख 35 हजार रु. असल्याचे सांगण्यात आले. महालिंगपूर, मुडलगी, गोकाक, मुधोळ, यादवाड या भागात वाहने चोरी झाल्याची प्रकरणे दाखल झाली होती. बागलकोट जिल्हा एसपी अमरनाथ रेड्डी, अतिरिक्त पोलीस प्रमुख प्रसन्न कुमार देसाई, महांतेश जिद्दी, जमखंडी डीवायएसपी शांत वीर ई यांच्या मार्गदर्शनाखाली बनहट्टी सीपीआय संजीव बळगार, महालिंगपूर पीएसआय मधु एल., किरण सतीगिरी यांनी तपास कार्य हाती घेऊन बसवराज इराप्पा खानटी प्रार्थना (वय 33), शिवबसू रेवाप्पा कौजलगी (वय 35) रा. गुर्लापुर, तालुका मुडलगी, मल्लाप्पा बजंत्री (वय 29) रा. कौजलगी या आरोपींना अटक करून चोरीस गेलेली वाहने जप्त केली. या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल एस. डी. बारीगिडद, व्ही. एस. अजनवर, बी. जी. देसाई, ए. एम. जमखंडी, बी. पी. हडपद, जीप चालक विठ्ठल बळगनवर आदींनी भाग घेतला.









