वार्ताहर /माशेल
तिवरे-माशेल येथे कारचाकी व दुधवाहू टँकरच्या झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले. कार्लोस फर्नांडिस (50), ईस्पा मिनेझिस (44), एडमिया (21) सर्व राहणारी आदोशी-तिसवाडी अशी त्यांची नावे आहेत. सदर अपघात तिवरे येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाजवळ काल बुधवार सायं. 5 वा. सुमारास घडला.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुधवाहू टॅकर जीए 07 एफ 8423 माशेलहून बाणस्तारीच्या दिशेने येत होता. तर कारगाडी जीए 06 ई 1948 बाणस्तारीहून माशेलमार्गे जात असताना तिवरे येथील सरकारी प्राथमिक विद्यालयाजवळ हा अपघात घडला. टँकरचालकाने चारचाकीला वाचविण्याच्या पूरेपूर प्रयत्नात पादचारी मार्गावर जाऊन स्थिरावला. कारगाडीने टँकरला बसलेल्या धडकेत महिला व मुलगी गंभीर जखमी झाली. सर्व जखमींना बांबोळी येथील गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला. याप्रकरणी हवालदार सुरज गावडे अधिक तपास करीत आहे.









