वाठार किरोली / वार्ताहर :
सुर्ली ता. कोरेगाव येथे रविवारी रात्री १० च्या सुमारास इर्टिका गाडी पलटी होऊन झालेल्या भीषण अपघातात आर्वी येथील ३ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
आर्वी ता. कोरेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तुकाराम आबाजी माने (वय ६५ ), तानाजी आनंद माने (वय ६२) सुभाष गणपत माने (वय ६०) हे तिघेजण साताराहून आर्वीकडे येत असताना सुर्ली गावानजीक असलेल्या वळणावर इर्टिका गाडीचा ताबा सुटल्याने ही गाडी पलटी झाली. या भीषण अपघातामध्ये तिघेजण गंभीर जखमी झाले होते. या तिघांना वाठार किरोली येथील युवकांनी सातारा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मात्र, रस्त्यातच दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एकाचा हॉस्पिटलमध्ये गेल्यावर मृत्यू झाला. आर्वी येथील तीन जणांचा अकाली अपघाती मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : राऊतांच्या घरी सापडलेल्या पैशांवर एकनाथ शिंदेंचा उल्लेख?









