बेळगाव :
सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून मार्केट व शहापूर पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी ही माहिती दिली आहे. मार्केटचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाजवळ मेहबूब बाबासाहेब देसाई, मूळचा राहणार महांतेशनगर, सध्या राहणार उज्ज्वलनगर याला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता गांजा सेवन केल्याचे स्पष्ट झाले. दुसरी कारवाई शहापूर पोलिसांनी केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मणिकंठ पुजारी व त्यांच्या सहकाऱ्यांनी जेल शाळेजवळ शंकर गोपाळ कांबळे, राहणार नाझर कॅम्प, वडगाव, किशन राकेश जंतीकट्टी, राहणार बाळकृष्णनगर, यरमाळ रोड, वडगाव या दोघांना गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून अटक केली आहे.









