कोल्हापूर :
शाहुपूरी पोलिसांनी एटीएम सेंटरमधून पैसे काढताना एटीएम कार्ड बदली करुन, फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य तिघा गुन्हेगाराना गुरुवारी रात्री उशिरा अटक केली. संस्कार बाळासाहेब पवार (वय 23, मुळ रा. बस्तवडे, ता. तासगाव, जि, सांगली, सध्या रा. फोर्ट रोड, रिवा, मध्यप्रदेश), अजय उर्फ अज्जू रमेश साहू (वय 29, रा. गिरवार थाना मझौली, जि. सीधी, राज्या मध्यप्रदेश), धमेंद्र उर्फ निशित शामसुंदर साहू (वय 19, रा. रायपूर कचुर्लियान गल्ला मंडी, जि. रिवा, राज्य मध्यप्रदेश) अशी त्याची नावे आहेत. या तिघाविरोधी मध्यप्रदेशसह महाराष्ट्रातील काही जिह्यातील पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
एटीएम केंद्रावर पैसे काढण्यासाठी आलेल्या लोकांना एटीएममधून पैसे निघत नाहीत. त्या ठिकाणच्या एटीएम केंद्रावर संस्कार पवार, अजय उर्फ अज्जू साहू, धमेंद्र उर्फ निशित साहू हे तिघे उभे राहून, लोकांना पैसे काढण्यासाठी मदत करण्याचा बहाणा कऊन, त्याचा एटीएम कार्डचा पीन क्रमांक विचाऊन घेवून, त्यांना पैसे काढून दिल्यानंतर, त्या लोकांच्या एटीएम कॉर्डची अदलाबदला करुन, दुसऱ्या एटीएम केंद्रावर जावून, लोकांच्या खात्यावरील परस्पर पैसे काढून लोकांची फसवणूक करीत होते. अशा प्रकारचे शहरात संस्कार पवार, अजय उर्फ अज्जू साहू, धमेंद्र उर्फ निशित साहू या तिघांनी अनेक प्रकार केले होते. त्यापैकी काही गुह्याची नोंद शाहुपूरी पोलीस ठाण्यात झाली होती. या गुह्याचा तपास पोलीस करीत असताना अशाच पध्दतीने एटीएम केंद्रावरुन लोकांची फसवणूक केलेल्या प्रकरणी या तिघा आंतरराज्य गुन्हेगारांना मध्यप्रदेश पोलिसांनी अटक केल्याची माहिती समजली.
त्यावरुन राजस्थान पोलिसांच्याबरोबर संपर्क साधून शाहुपूरी पोलिसांनी संस्कार पवार, अजय उर्फ अज्जू साहू, धमेंद्र उर्फ निशित साहू या तिघा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक करुन, गुरुवारी रात्री उशिरा कोल्हापूरात आणले आहे. या तिघांनी संगनमताने शाहुपूरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फसवणूक केल्याची कबुली केल्याची दिली आहे, अशी माहिती शाहुपूरी पोलिसांनी दिली.








