दोघांनी स्वीकारला पदभार ; आ. निलेश राणेंचा पाठपुरावा
मालवण : प्रतिनिधी
सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालय सिंधुदुर्ग मालवण येथे रिक्त असलेल्या पदांवर तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती नव्या मत्स्य हंगामाच्या प्रारंभालाच अर्थात 1 ऑगस्ट रोजी करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यातून खासदार नारायण राणे, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून ही नियुक्ती महायुती सरकारकडून करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख दत्ता सामंत यांनी दिली आहे.नव्या मत्स्य हंगामाची सुरुवात 1 ऑगस्ट पासून झाली. मत्स्यव्यवसायचा कारभार अधिक सुलभ व्हावा. मच्छीमारांना न्याय मिळावा या भावनेतून 1 ऑगस्ट पूर्वीच या सर्व नियुक्त्या देण्यात आल्या. यातील सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी सोनल तोडणकर, सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी गणेश टेमकर हे अधिकारी नियुक्त झाले. त्यांनी 1 ऑगस्ट पासून पदभार ही स्वीकारला आहे. तसेच सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी भक्ती पेजे यांनाही नियुक्ती देण्यात आली असून त्याही लवकरच मालवण कार्यालयात रुजू होणार आहेत. सोबतच मालवण सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त पदाचा पदभार प्रतीक महाडवाला यांच्याकडे प्रभारी स्वरूपात देण्यात आला आहे. वैद्यकीय रजेवर असलेले सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर हे लवकरच पुन्हा आपला पदभार स्वीकारतील. अशी माहिती दत्ता सामंत यांच्या वतीने देण्यात आली आहे. आमदार निलेश राणे नेहमीच मच्छीमारांच्या सोबत आहेत. आपले कुटुंब या भावनेने ते काम करत असताना अधिकाधिक न्याय मिळवून देण्यासाठी काम करत असतात. त्यांच्यात पाठपुराव्याने खासदार नारायण राणे मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून महायुती सरकार कडून ही नियुक्ती झाली आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांनी मत्स्य खात्याचा पदभार घेतल्या पासून अधिक गतीमानता प्राप्त झाली आहे. मत्स्य व्यवसायला कृषी दर्जा मिळाला. सोबतच अनेक हिताचे निर्णय झाले. महाराष्ट्राचे मत्स्य उत्पादन वाढले आहे. गतिमान निर्णय व विकासाचा आलेख असाच उंच राहील. असे दत्ता सामंत यांनी सांगितले.









