वृत्तसंस्था /भुवनेश्वर (ओदिशा)
2023 च्या येथे गुरुवारपासून सुरू झालेल्या 39 व्या उपकनिष्ठांच्या तसेच 49 व्या राष्ट्रीय कनिष्ठांच्या जलतरण स्पर्धेत ओदिशाच्या जलतरणपटूंनी तीन नवे राष्ट्रीय विक्रम नोंदवले. सदर स्पर्धा येथील कलिंगा क्रीडा संकुलाच्या जलतरण तलावात सुरू आहे. गट 1 मुलांच्या विभागात 100 मी. बटरफ्लाय जलतरण प्रकारात आसामच्या जे हझारिकाने सुवर्णपदक मिळवताना 55.99 सेकंदाचा अवधी घेतला. हझारिकाने अंतिम लढतीत कर्नाटकाच्या कार्तिकियन नायरचा पारभव केला. या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी कर्नाटकाच्या महिला जलतरणपटूंनी दर्जेदार कामगिरी केली. मुलींच्या गट 1 मध्ये 200 मी. वैयक्तिक मिडले या क्रीडा प्रकारात कर्नाटकाच्या मानवी वर्माने सुवर्णपदक मिळवले. महिलांच्या गट 2 प्रकारात तनिशी गुप्ताने 200 मी. वैयक्तिक मिडले या प्रकारात नव्या राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. कर्नाटकाच्या नैशाने या प्रकारात रौप्यपदक मिळवले. कर्नाटकाच्या मानवी वर्माने रौप्यपदक घेतले. गुरुवारी तीन नवे राष्ट्रीय विक्रम विविध प्रकारात नोंदवले गेले. मुलांच्या गट 1 मध्ये 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कर्नाटकाच्या विदित शंकरने नव्या स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक हस्तगत केले. त्याने आसामच्या वनीश पेनुयी यांचा 2022 साली नोंदवलेला स्पर्धा विक्रम मागे टाकला. सदर स्पर्धेचे अधिकृत उद्घाटन ओदिशाच्या क्रीडा युवजन खात्याचे क्रीडा सचिव तसेच आयुक्त आर. विनित कृष्णा यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.









