वृत्तसंस्था/ गाझियाबाद
येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया राष्ट्रीय मानांकन महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत महाराष्ट्राची महिला वेटलिफ्टर आकांक्षा व्यवहारेने तीन नवे राष्ट्रीय विक्रम नोंदविले. आकांक्षा व्यवहारे ही महिला वेटलिफ्टर टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीमची सदस्य आहे.

आकांक्षाने महिलांच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत 40 किलो वजन गटात स्नॅच तसेच क्लीन आणि जर्क आणि एकूण अशा तीन प्रकारात हा पराक्रम केला. स्नॅचमध्ये तिने 60 किलो वजन उचलत नवा राष्ट्रीय विक्रम नोंदविला. क्लीन आणि जर्कमध्ये तिने 71 किलो तसेच एकूण 131 किलो वजन उचलत नवा राष्ट्रीय विक्रम केला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक मिळविणारी भारताची महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू उपस्थित होती. या वर्षाच्या प्रारंभी हिमाचल प्रदेशमध्ये आयोजिलेल्या खेलो इंडिया वेटलिफ्टिंग स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात मीराबाई चानूने सुवर्णपदक मिळविले होते.









