अटकेच्या भीतीने पळाले गोव्याबाहेर
प्रतिनिधी /पणजी
राज्यातील जमीन घोटाळा प्रकरणात पोलिसांचे विशेष तपास पथक (एसआयटी) कसून तपास करीत असून आणखी तीन संशयित पोलिसांच्या रडारावर असून त्यांना लवकरच अटक केली जाईल अशी माहिती एसआयटी प्रमुख अधीक्षक निधीन वालसन यांनी दिली.
तिन्ही संशयितांची ओळख पटली आहे. पोलीस अटक करणार असल्याची माहिती त्यांना मिळाल्याने तिघेही गोव्याबाहेर पळाल्याचे समजते. ते ज्या ठिकाणी आहेत त्याचा सुगावाही पोलिसांना लागला आहे. पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी एक पथक रवाना केले आहे.
शिवानंद मडकईकर याला न्यायालयाने सशर्थ जामिनावर सोडले आहे. धिरेश नाईक व मोहम्मद सुहेल सुफी यांनीही जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केले असून काल मंगळवारी त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली असून आज बुधवारी निवाडा जाहीर करण्यात येणार आहे.









