वृत्तसंस्था/ लंडन
इटलीचा टॉप सिडेड टेनिसपटू जेनिक सिनेर याच्यावर तीन महिन्यांची बंदी घालण्याचा निर्णय वाडाने घेतला आहे. विश्व उत्तेजक विरोधी संघटना आणि सिनेर यांच्यात झालेल्या समझोत्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.
जेनिक सिनेर यापूर्वी दोनवेळा उत्तेजक चाचणीमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर आंतरराष्ट्रीय टेनिस एजन्सीने सिनेरवर निलंबनाच्या कारवाई विरोधात दाद मागितली होती. दरम्यान वाडाने या प्रकरणी समझोता केल्यानंतर त्याच्यावर तीन महिन्यांची बंदी घातली आहे. सिनेरच्या बंदीचा कालावधी 9 फेब्रुवारी ते 4 मे दरम्यान राहिल. सिनेर आता 7 मे पासून रोममध्ये सुरू होणाऱ्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत आपले पूनरागमन करेल.









