सहा मोबाईल व एक लेपटॉप जप्त
पणजी : कळंगुट पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन मोबाईल चोरट्यांना अटक केली असून 6 मोबाईल फोन आणि एचपी लॅपटॉप असा एकूण ऊ. 150000/- अंदाजे. ऐवज जप्त केला आहे. संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. तीन्ही संशयितांना आज रिमांडसाठी न्यायालयात हजर केले जाईल. पोलासांनी दिलेल्या माहितीनुसार अटक केलेल्या संशdियातांमध्ये माजिदोर मोल्ला, (35 ओल्डगोवा, मुळ उत्तर पश्चिम बंगाल) जोहऊल आलम मुल्ला, (27 कळंगुट, मुळ पश्चिम बंगाल), सैफुल आलम (22 बागा मुळ पश्चिम बंगाल) यांचा समावेश आहे, संशdियात कळंगुट भागात संशयास्परित्या फिरत असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले आणि कलम 41 अंतर्गत अटक करून त्यांची कसून उलट तपासणी केली असता संशdियातांनी कळंगुट येथे येणाऱ्या पर्यटकाचा मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्यानंतर चारलेल्या मोबाईलचा शोध घेण्यात आला असता संशdियातांकडून 06 मोबाईल फोन आणि 01 लॅपटॉप असा एकूण ऊ. 1,50,000/- किमंतीचा ऐवज जप्त करण्यात आला. हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉन्स्टेबल भगवान पालयेकर, गणपत तिलोजी, अमीर गरड आणि आकाश नाईक यांनी ही कारवाई केली आहे. एसडीपओ विश्वेश कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक दत्तगुऊ के सावंत व त्यांची टीम पुढील तपास करीत आहेत.









