वृत्तसंस्था/ दुबई
आठव्या फझा पॅरा विश्व मानांकन तिरंदाजी स्पर्धेत भारताने तीन पदकांची कमाई केली. या स्पर्धेत भारतीय तिरंदाज राकेश कुमारने दोन पदके मिळवली.
पुरुषांच्या खुल्या कंपाऊंड तिरंदाजी प्रकारात राकेशकुमारने इंडोनेशियाच्या केनचा 147-143 असा पराभव करत सुवर्णपदक मिळवले. त्यानंतर त्याने कंपाऊंड मिश्र सांघिक प्रकारात शितल देवी समवेत कास्यपदक मिळवताना कोरियाचा 155-152 असा पराभव केला. महिलांच्या रिकर्व्ह खुल्या तिरंदाजी प्रकारात भारताच्या पूजाने रौप्यपदक मिळवले. सुवर्णपदकासाठीच्या लढतीत इटलीच्या मिजिनोने पूजाचा 6-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक पटकावले.









