बेळगाव : पोलिसांनी मटका धंद्याविरोधात कारवाईची तीव्र मोहीम सुरूच ठेवली आहे. सोमवार दि. 16 रोजी शहरातील विविध ठिकाणच्या मटका अड्ड्यांवर छापे टाकून तिघांना अटक करण्यात आले आहे. त्यांच्याकडून 6620 रुपयांची रोकड, 6 हजार किमतीचा एक मोबाईल संच व मटका साहित्य असा एकूण 12620 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे. कलमेश बसप्पा कालेरी (रा. तुम्मरगुद्दी), रमेश बडनाईक (रा. तुम्मरगुद्दी), जिया इनामदार (रा. बेळगाव), शांताप्पा भिमाप्पा बागराई (रा. नायक गल्ली, हुदली) आणि चंद्रशेखर पडदय्या करजगीमठ (रा. कंग्राळ गल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या मटका बुकींची नावे आहेत. कलमेश, रमेश आणि जिया यांना सीसीबीचे पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी अटक करून त्यांच्याकडून 2700 रुपयांची रोकड, 6 हजार रु. किमतीचा मोबाईल जप्त केला आहे. दुसऱ्या कारवाईत शांताप्पा याच्यावर मारिहाळ पोलिसांनी कारवाई करून 1220 रुपयांची रोकड व मटका चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत. चंद्रशेखर याच्यावर माळमारुती पोलिसांनी त्याच्याकडून 2700 रु. ची रोकड व मटका चिठ्ठ्या जप्त केल्या आहेत.
Previous Articleदुचाकी अपघातात एक ठार
Next Article चक्क सापासह शेतकरी पोहोचला सिव्हिलमध्ये
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









