वार्ताहर,उंडाळे/कराड
कराड तालुक्यातील उंडाळे भागातील येणपे-लोहारवाडी येथे रिक्षाचा भीषण अपघात झाल्याची घटना शनिवारी समोर आली. या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला असून तिघांना जीव गमवावा लागला आहे. घटनास्थळी पोलिसांसह स्थानिक ग्रामस्थांनी गर्दी केली असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
येणपेच्या लोहारवाडी परिसरात रिक्षाला भीषण अपघात झाला. शनिवारी सकाळी अपघात झाल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून जखमींना मदतीसाठी प्रयत्न सुरू केले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांचा मृत्यू झालाआहे. मात्र मृतांची ओळख अद्यापही पटलेली नाही. पोलिसांनी जाऊन जखमींची विचारपूस करत नेमका अपघात कसा झाला याची चौकशी सुरू केली होती. या भीषण अपघाताची चर्चा पसरल्याने घटनास्थळावर गर्दी झाली होती.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









