तुमकूर जिल्ह्यातील घटना : दोघांची प्रकृती गंभीर
बेंगळूर : खासगी बस आणि कारची समोरासमोर धडक झाल्याने तीन जणांचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती गंभीर आहे. तुमकूर जिल्ह्याच्या कोरटगेरे तालुक्यातील बेळधर गेटजवळ शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली. शिवकुमार (वय 28), गोविंदप्पा (वय 60, दोघेही रा. कत्तीनागेनहळ्ळी, ता. कोरटगेरे) आणि शिवशंकर (वय 28, रा. बैचापूर) अशी मृतांची नावे आहेत. गोपाळ (वय 28, रा. कत्तीनागेनहळ्ळी) आणि शंकर (वय 28, रा. रेड्डीहळ्ळी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वरील सर्वजण कारने धर्मस्थळाला जात होते, असे सांगण्यात येत आहे. तुमकुरहून पावगडला जाणारी खासगी बस पुढे जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी कोरटगेरेहून तुमकूरला येणाऱ्या कारला समोरून जोराची धडक दिली. यात कारमधील शिवकुमार व शिवशंकर यांचा जागीच ठार झाले. गोविंदप्पा यांना ऊग्णालयात नेत असताना वाटेतच मृत्यू झाला. अपघातानंतर खासगी बसचालक घटनास्थळावरून पलायन केले आहे. चालकाचा निष्काळजीपणा या घटनेचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. तुमकूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.









