भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून तातडीने दखल
वृत्तसंस्था/ माली
पश्चिम आफ्रिकेतील माली येथे तीन भारतीयांचे अपहरण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अपहृत भारतीय सिमेंट कारखान्यात काम करायचे. अल-कायदाशी संबंधित दहशतवाद्यांनी पश्चिम आणि मध्य मालीमधील अनेक लष्करी आणि सरकारी तळांवर हल्ला केला. या काळात कायेस येथील सिमेंट कारखान्यावरही हल्ला झाला. याचदरम्यान अपहरणाची ही घटना घडली आहे. बामाको येथील भारतीय दूतावास संपूर्ण घटनेवर सक्रियपणे काम करत आहे. प्रशासन, सुरक्षा संस्था आणि सिमेंट कारखान्याच्या व्यवस्थापनाशी सतत संपर्क ठेवला जात आहे. भारत सरकारने या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करताना भारतीयांची सुरक्षित आणि लवकर सुटका करण्याचे आवाहन केले आहे.









