वृत्तसंस्था/दुबई
2024 च्या क्रिकेट हंगामातील आयसीसीच्या सर्वोत्तम महिलांचा टी-20 संघ जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये भारताच्या तीन महिला क्रिकेटपटूंचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघातील उपकर्णधार स्मृती मानधना, अष्टपैलु दिप्ती शर्मा आणि रिचा घोष यांना या संघात स्थान मिळाले आहे.
आयसीसीच्या या संघामध्ये द. आफ्रिकेच्या दोन खेळाडूंना तर लंका, इंग्लंड, विंडीज, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड आणि पाक या देशाच्याप्रत्येकी एका खेळाडूला संधी देण्यात आली आहे.
आयसीसी महिला संघ: वूलव्हर्ट (कर्णधार), कॅप, स्मृती मानधना, रिचा घोष, दिप्ती शर्मा, चमारी अट्टापटू, मॅथ्युज, नॅट सिव्हेर ब्रंट, मिली केर, प्रेंडरगेस्ट आणि सादीया इक्बाल









