सातारा,प्रतिनिधी
सातारा तालुक्यातील पिलाणी येथे तीन घरांना सोमवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु तोपर्यंत तीन घरे जळून खाक झाली. सुमारे 8 लाख रुपयांची हानी झाली असून याची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, सातारा तालुक्यातील पिलाणी येथील अरुण मारुती साळुंखे, रामचंद्र हरी साळुंखे आणि जयवंत भाऊ साळुंखे या तिघांच्या घरांना आग लागल्याची माहिती ग्रामस्थांना दुपारी समजताच धुराचे लोट पाहून ग्रामस्थांनी हातात हंडे, कळशा घेऊन ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले तोपर्यंत वाऱ्याच्या वेगाने आगीने रौद्र रूप धारण केले होते. या लागलेल्या आगीत संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. या घटनेची माहिती बोरगाव पोलिसांना मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी पवार हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी पाहणी केली. या घटनेचा तपास बोरगाव पोलीस करत आहेत.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









