एशियन स्पर्धेसाठी निवड
बेळगाव : दुबई येथे नव्या आंतरराष्ट्रीय वयस्करांच्या अॅथलेटिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कर्नाटक-बेळगावचे वयस्कर धावपटू सुरेश देवरमनी यांनी तीन विविध प्रकारात सुवर्ण पदक पटकावित. फिलिफाईन्स येथे होणाऱ्या एशियन मास्टर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी त्यांची भारतीय संघात निवड झाली आहे. दुबई येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय वयस्करांच्या अॅथलेटिक स्पर्धेत भारताचे नेतृत्व करताना 70 वर्षावरील वयोगटात 10 किलो मीटर धावण्याची स्पर्धा, 5 किलो मीटर धावण्याची स्पर्धा व पाच किलोमीटर वॉक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावित. भारताच्या खात्यात तीन सुवर्ण पदके दिली आहेत. निवृत्त जवान सुरेश देवरमनी यानी देशाची सेवा करत धावण्याच्या छंदामुळे अनेक राज्य व राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी केलेल्या उल्लेखनिय कामगिरीबद्दल त्यांची दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक्स स्पर्धेत निवड करण्यात आली होती. त्यामध्ये त्यांनी तिन्हीबाबीत यश संपादन करीत तीन सुवर्ण पदके भारताला मिळवून दिले. दुबईत मिळविलेल्या यशानंतर नोव्हेंबर महिन्यात फिलीफॉईन्स येथे होणाऱ्या एशियन मास्टर अॅथलेटिक्स स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. सुरेश देवरमनी हे उचगावचे रहिवासी असून सध्या ते चन्नम्मानगर येथे वास्तव्य करीत आहेत.









