बेळगाव : तुमकूर येथे घेण्यात आलेल्या सरकारी नोकरदार राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत बेळगावच्या आरोग्या खात्याच्या अधिकारी ज्योती होसट्टी यांनी तीन सुवर्ण पदके पटकावित घवघवीत यश संपादन केले आहे. तुमकूर येथे घेण्यात आलेल्या सरकारी नोकर राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. बेळगाव जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करताना बेळगाव आरोग्य खात्याचे अधिकारी ज्योती होसट्टी यांनी 100 व 200 मीटर फ्री स्टाईल तर 100 मीटर बॅकस्ट्रोक या तिन्ही प्रकारात प्रथम क्रमांकासह तीन सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. यापूर्वीही राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्योती होसट्टी यानी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
Previous Articleअनिलकुमार सायनीला ज्युडो स्पर्धेत कास्य
Next Article गोमटेशचे खेळाडू राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र









