Three Eureka students in Goa Team at FTC World Robotics Competition
FIrst Tech Challenge ही जागतिक स्तरावरील प्रतिष्ठीत रोबोटीक्स स्पर्धा असून हि स्पर्धा दोन स्तरांवर घेतली जाते. पहिली फेरी देशस्तरावर घेतली जाते.यंदा देशाच्या विविध भागातील 50 पेक्षा जास्त संघानी पहिल्या फेरीसाठी नोंदणी केली आहे.देशस्तरावरील स्पर्धेद्वारे 2 संघाची निवड जागतिक स्तरावरील स्पर्धेसाठी केली जाते.यंदाची भारतातील पहिली फेरी पुणे येथे होणार असून अंतिम फेरी अमेरिकेत होणार आहे. Science, Technology, Engineering व Mathematics मधील विद्यार्थ्यांच्या संकल्पना लहान वयातच परिपूर्ण व्हाव्यात हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असून या बरोबरच विद्यार्थ्यांच्या कोंडीग स्किल,प्रेझेंटेशन स्किल,साघिंक कौशल्य, मार्केटिंग स्किल, पब्लिक स्पिकिंग स्किल डेव्हलप व्हाव्यात यासाठी FTC आयोजन केले जाते.
या स्पर्धेमध्ये कोडींग साठी जावा या प्रोग्रामिंग लँग्वेज चा वापर केला जातो. गोवा टिम मधील बहुतेक सर्वच विद्यार्थी गेली चार-पाच वर्षे रोबोटिक्स क्षेत्रात काम करत असून त्यांनी बऱ्यापैकी जावा या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये प्रभुत्व मिळवले आहे. महत्त्वाचे म्हणजे या टीम मधील बहुतेक सर्वच विद्यार्थी सातवी ते नववी मध्ये शिकत असून एक विद्यार्थी अकरावी मध्ये शिकत आहे. या विद्यार्थ्यांनी निधी जमा करण्यासाठी गोव्यातील विविध शाळांमध्ये रोबोटिक प्रात्यक्षिके आयोजित करून रुपये 50 हजार पेक्षा जास्त निधी गोळा केला. विद्यार्थ्यांना रोबोटिक्स अवेअरनेस करण्यासाठी संजय गांधी दिव्यांग शाळा, पीपल्स हायस्कूल, तसेच चोराव बेटावरील शाळेत विद्यार्थ्यांना मोफत रोबोटिक्स बद्दल मार्गदर्शन केले.या टिमला गोवा सरकार तसेच गोव्यातील प्रसिद्ध धेंपो,गोवा ग्लास फायबर ,नानू वगैरे कंपन्यानी रोबोटिक चे पाटऀस खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे.
गोव्यातील टीम मध्ये युरेकाचे तीन विद्यार्थी सहभागी असून त्यामध्ये समीहन पांगम,आर्यन गोळे तसेच पार्थ पाटील याचा समावेश आहे. यापैकी समीहन पांगम,आर्यन गोळे यांनी राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर विविध स्पर्धांमध्ये यश मिळवले असून दोन आठवड्याची IBM या जागतिक स्तरावरील अग्रगण्य कंपनीची Internship देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.पुढच्या वर्षी सिंधुदुर्गातून किमान दोन टीम्स या स्पर्धेमध्ये सहभागी व्हाव्यात यासाठी युरेका प्रयत्नशील आहे.
साटेली भेडशी प्रतिनिधी









