ऑनलाईन टीम / तरुण भारत :
परभणीचे ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव यांना जीवे मारण्यासाठी एका गँगला 3 कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे परभणीत एकच खळबळ उडाली आहे. खा. जाधव यांनी यासंदर्भात पोलीस अधीक्षक रागसुधा आर आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
दोन दिवसांपूर्वी खा. जाधव यांना आपल्याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आल्याची माहिती खबऱ्यांमार्फत मिळाली होती. त्यानंतर त्यांनी परभणी जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक आणि गृहमंत्र्यांकडे याबाबत तक्रार दाखल केली. दरम्यान, आपले कुणाशीही वैर नाही. कोणाच्या कोणत्याही व्यवहारात आपला हस्तक्षेप नाही. त्यामुळे माझा कोणावरही संशय नाही, असे त्यांनी पोलिसांना सांगितले आहे. जाधव यांना यापूर्वीही नांदेड येथील रिंधा गँगकडून जीवे मारण्याची धमकी आली होती. जाधव हे परभणीचे दोन वेळा आमदार राहिले आहेत. आता सलग दुसऱ्यांदा ते खासदार आहेत.
अधिक वाचा : बच्चू कडूंची आमदारकी कधी रद्द होणार?