बेळगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीत सहभागी होण्यासाठी रवाना होण्याआधी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तिन्ही नगरसेवकांनी छ्त्रपती शिवरायांचा आशीर्वाद घेतला.नगरसेवक रवी साळुंके,शिवाजी मंडोळकर आणि वैशाली भातकांडे हे तिघे शिलेदार मनपा कडे रवाना झालेत सभागृहात आगामी पाच वर्षात याच तीन नगरसेवकांवर मराठी अस्मिता टिकवण्याची जबाबदारी असणार आहे त्याची सुरुवात महापौर निवडणुकी तून होणार आहे.
या निवडणुकीत समितीचे हे तीन नगरसेवक कोणती भूमिका घेणार याकडेही सीमा भागातील मराठी जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
एकेकाळी मनपा सभागृहात निविर्वाद सत्ता मिळवणाऱ्या मोठी संख्या असणाऱ्या समितीकडे केवळ तीन नगरसेवक आहेत ते तिघे जण कशी कामगिरी करतात व मराठी आस्मिता दाखवतात हे देखील पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.








